महाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी नोंदवली.

विजयी उमेदवारांची यादी

छत्रपती संभाजीनगर – जालना : सुहास शिरसाट (भाजप)

ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध

रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध

पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध

नाशिक : गोकुळ गिते (अपक्ष, भाजप समर्थक)

भंडारा – गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर : अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध

सांगली – सातारा : धैर्यशील कदम (भाजप)

धाराशिव – लातूर – बीड : बसवराज पाटील (भाजप)

नागपूर : राजीव पोतदार (भाजप)

जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप)

परभणी – हिंगोली : सईद खान (शिवसेना)

सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप)

अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)

नांदेड : अमर राजूरकर (भाजप)

या निकालामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महायुतीला मोठे राजकीय बळ मिळाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

17 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

1 दिवस ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago