महाराष्ट्र

माहिम कोळीवाड्यातील ‘त्या’कोळी महिलेची महेश सावंत यांनी घेतली भेट

मुंबई: माहिम रेतीबंदर येथील कोळीवाड्यातील प्रचारादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर कोळी महिलेला धमकी देऊन व तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गंभीर बाब समोर येताच आज माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी मंगला तांडेल या कोळी महिलेची भेट घेऊन तिच्या दुःखावर फुंकर घालत संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे असल्याची ग्वाही देत धीर दिला.

महेश सावंत हे मंगला तांडेल यांच्या घरी भेटण्यासाठी गेले असता, त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सावंत यांचे औक्षण करताना आमचा अपमान केला गेलाय, त्यामुळे आम्हाला न्याय द्या, न्याय पाहिजे, आम्हाला काही नको फक्त दोन शब्द नीट बोला असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी महेश सावंत यांनाही गहिवरून आले, त्यांनी तांडेल यांना धीर देत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

माझ्या बाजूने उभे राहिल्यास सोसायटीतील सदस्य पद रद्द करणार, असा दबाव माहिम मच्छिमार कॉलनीतील बायकांवर टाकण्यात येत आहे. राजकारण तुमच्या घरी करा सामान्य माणसासोबत करू नका. या स्टॉलसाठी पालिकेने परवाने दिले असताना शाखाप्रमुख मिलिंद तांडेल यांच्या फायद्यासाठी जून 2023 पासून त्रास देणे सुरू केल्याचा आरोप मंगला तांडेल यांनी केला. याबाबत माजी मंत्री दीपक केसरकर यांना भेटून तक्रार केली तेव्हा त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती तांडेल यांनी दिली.

याबाबत हकीकत अशी की, माहिम रेतीबंदर येथील कोळीवाड्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल का हटवले, ते कधी सुरू करणार असा थेट जाब विचारत एका महिलेने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना जाब विचारला. तसेच तुमच्या हातापया पडून झाले. आता आमच्या पोटावर आले आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा असा संताप व्यक्त करत त्यांना प्रचारादरम्यान घरात येण्यास मनाई केली होती. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होताच मंगला तांडेल व शिक्षणासाठी परदेशात असलेल्या त्यांच्या मुलाला धमकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर त्यांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कोळी भगिनींना न्याय देऊ- सावंत

बनावट स्टोरी रचण्यात सदा सरवणकर यांचा हातखंडा आहे. येथे मंगला तांडेल ताई यांना आधार देण्यासाठी आलो आहे. आता आरोप करताना आधी अवैध धंदे दिसले नाही का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांनी केला. नाहक कोणाची बदनामी करणे चुकीचे आहे, जनता सुज्ञ आहे. येत्या २० तारखेला जनता त्यांना धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया महेश सावंत यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

17 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago