महाराष्ट्र

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित ‘व्होटचोरी’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने राज्यभर ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन केले. बुलढाणा येथील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.

“भाजपा सरकार हे चोरीचे सरकार आहे आणि त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मदत केली आहे,” असा आरोप सपकाळ यांनी केला. ‘व्होटचोरी’ आणि SIRच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना भेट दिली जात नसल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, विरोधकांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरही सपकाळ यांनी टीका केली. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाही मूल्ये आणि संविधानिक संस्थांच्या स्वायत्ततेचा प्रश्न उपस्थित केला. ‘ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’ या घोषणेसह आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसच्या काळात निवडणूक आयोगासह विविध स्वायत्त संस्थांची उभारणी झाली. मात्र, या संस्थांवर भाजपने कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलन करत असताना फडणवीस यांनी आयोगाचा बचाव करण्याची गरज का भासते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, बुलढाण्यातील आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सपकाळ यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

नांदेड, बुलढाणा, नाशिक, अमरावती, नागपूर, चिपळूणसह राज्यातील विविध जिल्ह्यांत ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाविरोधातील आरोप फेटाळून आयोगाने आपले निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार झाल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

8 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

10 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

11 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

11 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago