पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी संतोष जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आसावरी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगदाळे कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेष प्रक्रिया राबवत आसावरी जगदाळे यांची प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२) पदावर नियुक्ती केली.
या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या भेटीत आसावरी यांनी डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे उपस्थित होत्या. डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कुटुंबाला भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी बाळासाहेब भांडे, आनंद गोयल, एकनाथ ढोले, विठ्ठल तांबे, ज्योती गाडे, सोनाली लांडगे, रिंकू मोरे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, २६ मार्च हा संतोष जगदाळे यांचा स्मृतिदिन असून, शासनाने दिलेली नोकरी ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.उल्लेखनीय म्हणजे, २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांच्यासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…