महाराष्ट्र

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

होमगार्ड जवानांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सेवा देऊनही त्यांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. एक-दोन महिने ड्युटी दिल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांचा ब्रेक दिला जातो. विशेष म्हणजे केलेल्या कामाचा पगारही चार ते सहा महिने रखडत असल्याने जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीतही दरवर्षी नवीन भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यमान जवानांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या आंदोलनात होमगार्ड जवानांनी सहभागी होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जारी केल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकामुळे होमगार्ड जवानांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात अडथळे निर्माण होत असल्याची टीका होत आहे.

यापूर्वी दैनिक द ग्लोबल टाइम्सच्या कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार नेत्या शीतल हरीश करदेकर यांनी अग्रलेखातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रात सध्या ५५ हजारांहून अधिक होमगार्ड कार्यरत असून, पोलिसांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची खंत जवानांनी व्यक्त केली आहे. आपत्ती, पूर, दुष्काळ, मोर्चे, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना वर्षभर रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

होमगार्ड जवानांच्या प्रमुख मागण्या

होमगार्ड कायद्यात तात्काळ दुरुस्ती करावी

वर्षभर (३६५ दिवस) कायमस्वरूपी काम द्यावे

सेवानिवृत्तीनंतर ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी

लोकहितेश निधीचा प्रश्न मार्गी लावावा

होमगार्ड कार्यालयातील वेतनी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी

विद्यमान समस्या सुटेपर्यंत नवीन भरती थांबवावी

निलंबित जवानांना पुन्हा सेवेत घ्यावे

पोलीस भरतीत वयोमर्यादा ३८ वर्षांपर्यंत वाढवावी

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

2 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

2 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

2 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

3 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

3 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

3 तास ago