मुंबई राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणात आणखी १० जणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे.
४ जुलै रोजी पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर तपासाला वेग आला आणि आरोपींच्या चौकशीतून आणखी दहा जणांची नावे समोर आली.
पाणी, शाम्पू आणि केमिकल्सचा वापर करून बनावट दूध
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी पाण्यात शाम्पू आणि विविध रसायने मिसळून बनावट दूध तयार करत असल्याचा आरोप आहे. हे बनावट दूध विविध दूध संकलन केंद्रांपर्यंत पोहोचवले जात होते. त्यानंतर तेथून नामांकित डेअरींना पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ब्रँडेड दुधाच्या पाकिटांमध्येही हे भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी सुशांत हिंगे याच्यासह १४ जणांना अटक केली होती.
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्याच्या पुतण्याचे नाव
दरम्यान, या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून मंचरमधून निवडून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू हिंगे यांचा पुतण्या असल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांतच्या चौकशीतून बनावट दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने आणि शाम्पू दूध संकलन करणाऱ्या आणखी दहा जणांना विकल्याचे समोर आले. अटक केलेल्या दहा जणांपैकी सात जण पुणे जिल्ह्यातील, दोन जण नगर जिल्ह्यातील आणि एक जण जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, विष्णू हिंगे हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावरही असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही आला आहे.
‘भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे’
दूध भेसळ प्रकरणावर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय असून, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. अशा प्रकारची भेसळ करण्याची पुन्हा कोणाचीही हिंमत होऊ नये, अशी शिक्षा झाली पाहिजे आणि सरकार या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…