महाराष्ट्र

मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक; अतुल लोंढे

मुंबई: वेदांदा-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती पण महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवून नेला पण आता तो तिथेही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी घणाघाती टीका महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाचा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातून पळवून नेला. तब्बल १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुक व १ लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अत्यंत अनुकुल असे आहे, पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी द्यावयाच्या सुविधा व सवलतीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या भागात य प्रकल्पाला जागा देण्यात आली त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या हाताखालून गेला. राज्यातील लाखो तरुणांचे रोजगारही गेले. प्रकल्प गुजरातला नेला पण गुजरात सरकार व केंद्र सरकारने या प्रकल्पाना सोयी सुविधा दिल्या नाहीत असे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार मोडीत काढल्याने आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भवितव्यावरही संशयाचे ढग जमा झालेत. वायब्रंट गुजरात व मेक इन इंडियाच्या नावाने मोठ्य-मोठ्या घोषणा केल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातील किती प्रकल्प आले यावर श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. फॉक्सकॉनने माघार घेतल्याने इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रातून याआधी वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क केमीकल्स यासह अनेक उद्योग व संस्था महाराष्ट्राबाहेर गेल्या त्याला भाजपा, फडणवीस हेच जबाबदार आहेत. रशिया-युक्रेनचे युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबवू शकतात पण देशातून जाणारे उद्योग मात्र थांबवू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सरकार कोणाचेही असो उद्योग निघून जाणे विकासाच्या दृष्टीने चांगले नाही, असेही लोंढे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago