मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकांचा सपाटा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली.
निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले असून महिन्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेत नवाब मलिक यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आढावा बैठक घेत आपला इरादा स्पष्ट केला असून आज या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला मुंबई मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागा लढण्यासदर्भात चर्चा करण्यात आली. यासंदर्भाचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे उद्या सूपुर्द केला जाणार आहे, अशीही माहिती माध्यमांना देण्यात आली.
बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव, व्यंकटेश मानव आदी उपस्थित होते.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…