नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णूपंत म्हैसधूने, डॉ.शेफाली भुजबळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कविताताई कर्डक, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, जीवन रायते, बाळासाहेब गीते, चेतन कासव, योगेश निसाळ, संतोष भुजबळ, आकाश कदम, चिन्मय गाढे, नागेश गवळी, प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात विविध विकासाची कामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकल टुरिझमला अधिक वाव आहे. यापुढील काळात ‘आयटी हब’ सह अनेक उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करून नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. तसेच राज्य सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकरी देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट फूड वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर रोजगार मेळाव्याचे उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असून हे काम अविरत सुरु राहील असेही छगन भुजबळ यांनी जाहीर केले. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी तर प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले.
माजी खासदार समीर भुजबळ यांचे यशस्वी नियोजन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यशस्वी नियोजन केले. गेल्या पंधरा दिवसांपासून चोख पद्धतीने नियोजन करून जिल्हाभरात याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंत्रणा राबविली. त्यांच्या या यशस्वी नियोजनामुळे या नोकरी महोत्सवामध्ये सुमारे साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली तर तीन हजारांहून अधिक तरुणांनी प्रत्यक्षरित्या सहभाग नोंदविला.
नोकरी महोत्सवात ५० हून अधिक कंपन्या संस्थांचा सहभाग
या नोकरी महोत्सवात पुणे आणि नाशिकमधील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायनान्स सेवा या क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी घेऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्यावतीने सहकार्य करण्यात आले.
पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या…
मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला…
मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card)…
रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार…