महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!

सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढाकारातून आमदारांचा स्तुत्य निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचे धनादेश सुपूर्द

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान वेतनाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असून, त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच स्वर्गीय अजितदादांनी दिलेली खरी शिकवण असल्याची भावना आमदारांनी यावेळी व्यक्त केली.

स्व. अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे आणि शेतकरी हितासाठी सदैव कटिबद्ध राहणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच प्रामाणिक भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संकटात लोकप्रतिनिधींनीही आपले योगदान द्यावे, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दररोज सकाळी हळदी शॉट्स प्या, रोगप्रतिकारकशक्तीसह मेंदूचे आरोग्य होईल निरोगी

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स,…

7 मिनिटे ago

गोकुळच्या कारभारात दूध उत्पादकांचे हित केंद्रस्थानी ठेवा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील यांना आवाहन

मुंबई : राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक…

23 मिनिटे ago

नेहरू जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कविता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; रामबंधु अढांगळे प्रथम क्रमांकाचे मानकरी

मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य…

15 तास ago

महाराष्ट्रातील ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटीची संधी

जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात; पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमसाठी प्रथमच सीईटी मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…

15 तास ago

दुष्काळात एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये; भरत गोगावले यांचे निर्देश

रोहयो आणि ‘व्हीबी जी राम जी’च्या कामांना गती द्या; जलसंधारण, चारा उपलब्धता आणि प्रलंबित देयकांवर…

15 तास ago

अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे विकासाचा वारसा पुढे नेणार; सुनेत्रा पवार

अमित शाह यांच्या हस्ते अजितदादांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; पुणे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव पुणे: “मी…

15 तास ago