महाराष्ट्र

दुष्काळात एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये; भरत गोगावले यांचे निर्देश

रोहयो आणि ‘व्हीबी जी राम जी’च्या कामांना गती द्या; जलसंधारण, चारा उपलब्धता आणि प्रलंबित देयकांवर भर

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रोजगार हमी योजना आणि ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत कामांची सर्व स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागात रोजगाराची मागणी करणारे एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहता कामा नये. रोजगारनिर्मितीबरोबरच जलसंधारण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयकांचा आढावा मंत्री गोगावले यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत घेतला. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देणे, हे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या कामातील जबाबदारी कोणत्याही स्तरावरील अधिकाऱ्याने टाळू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

११६ कोटींच्या निधीच्या वापराबाबत कडक सूचना

राज्य शासनाने ११६ कोटी रुपयांचा पूरक कुशल निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी केवळ शासनमान्य आणि निधी वितरण पत्रात नमूद केलेल्या कामांवरच खर्च करावा. पाणंद रस्त्यांच्या ज्या कामांना पूरक कुशल निधीची मान्यता मिळाली आहे, त्यांचीच देयके अदा करावीत. निधीच्या वापरात कोणतीही अनियमितता किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही गोगावले यांनी दिला. उपलब्ध निधी योग्य कामांसाठी, योग्य लाभार्थ्यांपर्यंत आणि वेळेत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.

चारा टंचाईग्रस्त जिल्ह्यांना कोकणातून चारा पुरविणार

चाऱ्याची सर्वाधिक टंचाई असलेल्या जिल्ह्यांचे तातडीने मूल्यांकन करून प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोकणात उपलब्ध असलेल्या गवताची कापणी सुरू करण्यात आली असून, नव्याने चारा उपलब्ध होईपर्यंत टंचाईग्रस्त जिल्ह्यांना शक्य तितका चारा पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

३८ कोटींचे वितरण पूर्ण; उर्वरित निधी शुक्रवारपर्यंत देणार

‘व्हीबी जी राम जी’ अंतर्गत ७६ कोटी रुपयांचे निधी हस्तांतरण आदेश प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८ कोटी रुपयांच्या वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित लाभार्थी आणि अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतींच्या खात्यांत रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३८ कोटी रुपयांचे प्रमाणीकरण पूर्ण करून येत्या शुक्रवारपर्यंत निधी वितरित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अकुशल कामांची मजुरी मस्टर बंद झाल्यानंतर उशिरात उशिरा सहा दिवसांच्या आत कामगारांच्या खात्यात जमा होईल, याची दक्षता घ्यावी. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांची जिल्हानिहाय कारणे तपासून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी. तसेच रोजगार सेवकांच्या मानधनासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही ग्रामपातळीवरील अडचणींमुळे मानधन प्रलंबित राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मजुरांचे स्थलांतर रोखण्याचे सचिवांचे निर्देश

बैठकीत विभागाचे सचिव अप्पासो धुळाज यांनीही जिल्हानिहाय आढावा घेतला. मजुरांचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासनाने मान्यता दिलेल्या आणि कमी पाण्यावर येणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. ज्या जिल्ह्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने रुजू करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीस सहसचिव अतुल कोदे, कैलास साळुंके, आयुक्त अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नेहरू जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कविता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; रामबंधु अढांगळे प्रथम क्रमांकाचे मानकरी

मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य…

34 मिनिटे ago

महाराष्ट्रातील ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटीची संधी

जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात; पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमसाठी प्रथमच सीईटी मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…

39 मिनिटे ago

अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे विकासाचा वारसा पुढे नेणार; सुनेत्रा पवार

अमित शाह यांच्या हस्ते अजितदादांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; पुणे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव पुणे: “मी…

48 मिनिटे ago

राज्यात गुंडाराज, अमित शाह अन् फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून माफिया आणि गुंडांकडून खुलेआम धमक्या दिल्या जात…

55 मिनिटे ago

२८ जानेवारी महाराष्ट्रासाठी काळा दिवस! पुतळ्यात अजितदादांचे कार्य मावणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे u

पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार…

2 तास ago

शेतातील डीपी चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश; पाच जणांना अटक

आठ ठिकाणी चोरीची कबुली; १७० किलो तांब्याच्या तारा जप्त, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

2 तास ago