महाराष्ट्र

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर होणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८, १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे नियोजित दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबीर’ आता शिर्डी येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिबिराची पूर्ण तयारी करण्यात आली होती मात्र या शिबिराला फ्रंटल व सेल आणि इतर पदाधिकाऱ्यांंनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचा आग्रह धरला त्यांची भूमिका मलाही योग्य वाटली आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत चर्चा करुन संख्या निश्चित केली आहे. पदाधिकाऱ्यांची जास्त संख्या लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासाची व्यवस्था अपुरी पडत असल्याने हे शिबीर शिर्डी येथे घेत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

या शिबिरात सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार आहे. शहर, जिल्हा, तालुक्यामध्ये सभासद नोंदणी योग्य पध्दतीने व्हावी यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. जेणेकरून विहीत कालावधीत सभासद नोंदणी पूर्ण करण्याचे नियोजन पक्षाचे आहे. या शिबिरात वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना प्रभावी मांडणी करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत. या शिबिरामध्ये पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून दोन दिवसीय नवसंकल्प शिबीरातून नवीन ऊर्जा… नवीन प्रेरणा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी फेब्रुवारीमध्ये पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम संघटनेला दिले जाणार आहेत. त्यातून पक्षाचा प्रभाव व्यापक पध्दतीने राज्यात निर्माण केला जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने आनंद परांजपे यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

10 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago