मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर

संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी.

हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई.

डीजेला फाटा: डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांना प्राधान्य.

प्री-वेडिंगला नकार: प्री-वेडिंग फोटोशूट बंद करावे, आणि केलेच तर जाहीर प्रदर्शन टाळावे.

कर्जावर लग्न नको: कर्ज काढून लग्नाचा खर्च टाळावा.

साधेपणाला महत्त्व: देखावा आणि अनावश्यक खर्च टाळावा.

एकत्रित कार्यक्रम: लग्न, साखरपुडा आणि हळदी समारंभ शक्यतो एकाच दिवशी आयोजित करावेत.

फेट्यांचा मान: केवळ वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत.

भेटवस्तू पर्याय: आहेरामध्ये भेटवस्तूंऐवजी पुस्तके, झाडांची रोपे किंवा रोख रक्कम द्यावी. मुलीच्या नावे एफडी करण्याचाही उत्तम पर्याय.

मोजके पदार्थ: जेवणात ५ पेक्षा जास्त पदार्थ नसावेत.

शिस्तप्रियता: नवरदेवापुढे मद्यपान करून नाचणाऱ्यांना आवर घालावा.

वर उचलण्यास मनाई: हार घालताना वराला उचलून घेण्याची प्रथा बंद करावी.

दशक्रिया विधी: दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करावा.

अंमलबजावणी आणि सन्मान

या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ११ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, आचारसंहितेचे उत्कृष्ट पालन करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

सामाजिक बदलासाठी पुढाकार

नगरमधील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे एन. बी. धुमाळ फाउंडेशनने आयोजित केलेल्या बैठकीत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. तनपुरे महाराजांनी समाजाला अनिष्ट रूढी सोडून बदलासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी कीर्तनकार व प्रबोधनकारांनी या आचारसंहितेच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

शिवरायांच्या आरतीबद्दल भूमिका

या बैठकीत सी. ए. ज्ञानेश्वर काळे यांनी लग्न समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याची प्रथा बंद करण्याची मागणी केली. “शिवराय आपले दैवत आहेत, त्यांना देवत्व बहाल करू नये. त्यांचा पराक्रम प्रेरणादायी आहे, आरती करून काही वर्षांनी तो पुसला जाईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराजांची आरती कोणीही कुठेही लावू नये किंवा ऐकू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. ही आचारसंहिता मराठा समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

11 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

11 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

11 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

11 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

11 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

1 दिवस ago