मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने आणखी एका प्रवेश फेरीची घोषणा केली आहे. ही फेरी 16 जुलैपासून सुरू होणार असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी मिळणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 ते 18 जुलै सायंकाळी 6 या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.
या फेरीचे प्रवेश वाटप 19 जुलै रोजी होणार असून, 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 20 ते 22 जुलै दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
यानंतर 23 जुलै रोजी माहिती प्रक्रिया पूर्ण होईल आणि 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…