मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत वाहतूक पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार मिलिंद देवरे आणि पोलीस अंमलदार लखन शिरसकर यांनी संयुक्तपणे सहभाग घेत महामार्गावरील सर्व अनधिकृत फलक हटवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या फ्लेक्समुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत होते. तसेच रस्ता ओलांडणारे नागरिक, समोरून येणारी वाहने किंवा वळणावरील हालचाली वेळेत दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. त्यामुळे ही कारवाई रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

यावेळी संबंधित व्यावसायिकांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, भविष्यात महामार्ग किंवा दुभाजकावर कोणतेही अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त करण्यास मोठी मदत होणार आहे.

“एक चुकीचा फ्लेक्सही जीवघेणा ठरू शकतो”

“महामार्गावरील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शिक्रापूर पोलीस, ग्रामपंचायत आणि पीएमआरडीएच्या सहकार्याने सातत्याने प्रयत्न करत आहेत. भविष्यात अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. फ्लेक्स लावण्यापूर्वी ग्रामपंचायत व पीएमआरडीएची आवश्यक परवानगी घेऊनच नियमांचे पालन करावे,” असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.

शिक्रापूर-मलठण रस्ता झाला चिखलमय; ठेकेदार कुठंय…

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी सहन केली जाणार नाही; खंडणीखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडी करून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद

शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरून ब्लॅकमेल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

6 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

20 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago