महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठ आणि सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

मुंबई: सिद्धांता नॉलेज फाउंडेशन (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक फाउंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचा संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते.नविन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना या संस्थेचे विद्यापीठाने सहकार्य घ्यावे,आणि आराखडा तयार करावा असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठ आणि सिध्दांता नॉलेज फाऊंडेशन (आयकेएस)यांच्या समवेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंजावरचे महाराजा राजे बाबाजी भोसले, श्रीमती गायत्री राजे भोसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलगुरू उज्जवला चक्रवर्ती, सिद्धांता नॉलेज फाउंडेशन अध्यक्ष जयकिशन झवेरी,कार्यकारी संचालक श्री सुदर्शन जी, सत्या अत्रेयम, महाराजा तंजावर टीम प्रीत खोना,वरिष्ठ प्रबंधक प्रमोद निशाणकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान पद्धती वर आधारीत विद्यापीठ स्तरावर केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली तसेच सिद्धांता नॉलेज फाउंडेशनने तयार केलेला अभ्यासक्रम विद्यापीठात व महाविद्यालय स्तरावर भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यासक्रमाशी मॅपिंग करून युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी राजे बाबाजी भोसले, तंजावर व सिद्धांता नॉलेज फाउंडेशनच्या समन्वयाने लागू करता येईल का यावर सविस्तरचर्चा करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

49 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

22 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

22 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

22 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago