महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ नव्हे, ‘फसवणूक बहीण’ योजना; अमोल मातेले

मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ‘लाडकी बहीण’ नसून ‘फसवणूक बहीण’ योजना असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

मातेले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली आणि आता मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून वगळण्यात आले. सरकारकडे प्रसिद्धी आणि इव्हेंटसाठी निधी आहे; मात्र गरीब व कष्टकरी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची वेळ आली तेव्हा तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, महिलांना फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे करून नंतर लाखो अर्ज बाद करणे हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. महागाईच्या काळात महिलांना आर्थिक मदतीची आशा दाखवून ऐनवेळी ती हिरावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.महिला वर्ग हा अपमान विसरणार नाही आणि या कथित फसवणुकीचा हिशोब आगामी निवडणुकांमध्ये घेतला जाईल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

13 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago