पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत आणि आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांनी त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांसह जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी पंढरपूरच्या वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच अपघातात जखमी झालेल्या भगिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी विठ्ठल चरणी प्रार्थनाही त्यांनी केली.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…