औरंगाबाद: शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. शासनाच्या ई-हक्क प्रणालीमुळे जमिनीशी संबंधित महत्त्वाचे ११ कागदपत्रे आता ऑनलाईन घरबसल्या मिळणार आहे.
ऑनलाईन ई-हक्क प्रणालीचे फायदे
या सुविधेमुळे नागरिकांना महा ई-सेवा केंद्राद्वारे किंवा स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज सादर करता येतात.
सात-बारा उताऱ्यातील फेरफार नोंदींचा कालावधी कमी करण्यासाठी या प्रणालीचा मोठा उपयोग होत आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी दिला जात आहे, ज्यामुळे वारंवार कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.
ई-हक्क पोर्टलवर उपलब्ध असलेल्या प्रमुख सेवा
या प्रणालीद्वारे तुम्ही खालील ११ प्रकारच्या नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता
जमीन खरेदी-विक्रीची फेरफार नोंद करणे
वारसाहक्काने नाव लावणे (वारस नोंद)
कौटुंबिक वाटणीची नोंद करणे
न्यायालयीन आदेशावरून सात-बारावर बदल करणे
जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी करणे
एकत्र कुटुंब नोंद कमी करणे
सात-बारावरील अपाक शेरा कमी करणे
इ-करार (E-Contract) नोंद करणे
विश्वस्ताचे (Trustee) नाव कमी करणे
नवीन बोजा चढविणे किंवा गहाणखताची नोंद करणे
संपत्तीचे हस्तांतरण आणि मृताचे नाव कमी करणे
या नवीन डिजिटल सुविधेमुळे सामान्य माणसाला सरकारी कार्यालयातील रांगांमधून मुक्ती मिळणार आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…