महाराष्ट्र

आमदार सचिन कल्याणशेट्टींना गोळ्या घालण्याची ऑफर? चालकाला दाखवले पैशांचे आमिष

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदारांना गोळ्या झाडून ठार करण्यासाठी चालकाला थेट ऑफर देण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरात आले होते. त्यावेळी त्यांचा वाहनचालक आनंद सुरवसे हा वाहनाजवळ थांबला होता. याचदरम्यान श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोघे त्याच्याजवळ आले.

दोघांनी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवत आमदारांवर गोळीबार करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आमदारांना ठार केल्यास मोठ्या पैशांचा फायदा होईल, तसेच पुढील बाबी आपण पाहून घेऊ, असे संशयितांनी चालकाला सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, ही धक्कादायक ऑफर ऐकताच आनंद सुरवसे यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी संशयितांकडे याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आनंद सुरवसे यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा केवळ पैशांचे आमिष दाखवण्याचा प्रकार आहे की आमदारांच्या हत्येचा मोठा कट रचण्यात आला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हा कट नेमका कोणाच्या सांगण्यावरून रचण्यात आला होता का? या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच संशयितांचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता पोलिस करत आहेत.आमदारांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणाकडे पोलिसांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

13 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

13 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

13 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

13 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

14 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

14 तास ago