महाराष्ट्र

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

औरंगाबाद: तुम्हाला आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. UIDAI ने नवीन नियम लागू केले असून आता आधार अपडेट प्रक्रिया आधीपेक्षा खूप सोपी झाली आहे.

आधार अपडेटसाठी UIDAI ची नवीन नियमावली

नवीन नियमानुसार आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता असेल तर ते आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल.

पूर्वी प्रत्येक माहिती साठी वेगळे दस्तऐवज द्यावे लागत होते, आता प्रक्रिया सोपी झाली आहे.

नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट – सर्वात विश्वसनीय दस्तावेज

पॅन कार्ड

मतदार ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन्स

सरकारी ओळखपत्र

विवाह प्रमाणपत्र

पत्ता बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

पासपोर्ट

बँक पासबुक किंवा स्टेटमेंट

वीज, पाणी, गॅस बिले (3 महिन्यांच्या आत)

भाडेकरार + पोलीस पडताळणी / नोटरी प्रत

मतदार ओळखपत्र

रेशन कार्ड

हाऊस टॅक्स / प्रॉपर्टी टॅक्स पावती

जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जन्म प्रमाणपत्र

पासपोर्ट

दहावी / बारावीची मार्कशीट

फिजिकल पॅन कार्ड

कोणतेही सरकारी ओळखपत्र ज्यावर जन्मतारीख नमूद आहे

UIDAI ची नवी सुविधा – एकाच कागदपत्रावर संपूर्ण अपडेट

जर एका कागदपत्रात तुमचा फोटो + नाव + पत्ता किंवा जन्मतारीख असेल, तर तेच आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल. यामुळे नाव बदलणे, पत्ता अपडेट करणे, जन्मतारीख सुधारणे हे खूप सोपे झाले आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

दिलेली कागदपत्रे मूळ आणि स्पष्ट असावीत

खाडाखोड नसावी

माहिती बदलण्यास मर्यादा

नाव – 2 वेळा

जन्मतारीख – 1 वेळ

लिंग – 1 वेळ

अपडेट करण्यासाठी आधार केंद्र किंवा myAadhaar पोर्टल वापरा

दुरुस्ती झाल्यावर आधार पोस्टाद्वारे घरी येईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago