महाराष्ट्र

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयावरूनही विरोधकांनी शंका उपस्थित केली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी, प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली, असा सवाल केला.

शेतकरी प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य

राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरूनही सरकारवर टीका करण्यात आली. जानेवारी महिन्यात मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत, बीड जिल्ह्यात सर्वाधिक २४ आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले. कर्जमाफी, पीकविमा आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईबाबत सरकारकडे ठोस धोरण नसल्याचा आरोप करण्यात आला. केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही निधी मिळालेला नसल्याचेही विरोधकांनी नमूद केले.

एसीबी कारवाईवरून राजीनाम्याची मागणी

मंत्रालयातील कथित ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणात एसीबीने धाड टाकून मंत्री झिरवळ यांच्या पीएला अटक केल्याचा उल्लेख करत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. काही मंत्र्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला. मुलुंड येथील मेट्रो स्लॅब दुर्घटनेचा उल्लेख करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

शक्तिपीठ महामार्गावरून वाद

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पावर आक्षेप घेत, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप केला. हा प्रकल्प कंत्राटदारांच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महाविकास आघाडीची बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago