महाराष्ट्र

पंढरपूर वारीच वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखांना होणार पालख्यांचं प्रस्थान…

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.

असा असेल माऊलींचा पालखी सोहळा?

11 जून 2023, रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. ज्यानंतर ही पालखी वारकऱ्यांसह पुणे भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार असून तब्बल 17 दिवसांच्या पायवारीनंतर ही पालखी 28 जून 2023 रोजी पंढरपुरात प्रवेश करेल. त्यानंतर 29 जून 2023 म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान असणार आहे. 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असून, त्याच दिवशी विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर पालखीचा परचीचा प्रवास वाखरीहून सुरु होईल.

असा असेल तुकोबारायांच्या पालखीचा प्रवास?

आळंदीहून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांची पालखू श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. एक दिवस आधी, म्हणजेच 10 जून 2023 रोजी ही पालखी ईनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रस्थान ठेवेल. पुढं ही पालखी आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे वाखरीला पोहोचेल. 28 जून 2023 ला पालखी पंढरपुरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) येथे मुक्कामी असेल. 29 जून 2023 ला पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडेल.

दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे?

संत तुकाराम महाराज पालखी

20 जून 2023 – बेलवडी (गोल रिंगण)

22 जून 2023 – इंदापूर (गोल रिंगण)

24 जून 2023 – अकलूज माने विद्यालय (गोल रिंगण)

25 जून 2023 – माळीनगर (उभं रिंगण)

27 जून 2023 – बाजीराव विहिर (उभं रिंगण)

28 जून 2023 – वाखरी (उभं रिंगण)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

20 जून 2023 – चांदोबाचा लिंब (उभं रिंगण)

24 जून 2023 – पुरंवडे (गोल रिंगण)

25 जून 2023 – खुडूस फाटा (गोल रिंगण)

26 जून 2023 – ठाकूरबुवाची समाधी (गोल रिंगण)

27 जून 2023 – बाजीरावची विहीर (गोल आणि उभं रिंगण)

28 जून 2023 – वाखरी (उभं रिंगण)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

20 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

20 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

20 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago