महाराष्ट्र

नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा

मुंबई: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले.

आज विधीमंडळात विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या कृतीसत्रात विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सन्माननीय आमदार सर्वश्री ॲड. अनिल परब, विक्रम काळे, विलास पोतनीस, किरण सरनाईक, सुधाकर आडबाले, अरुण लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, वजहात मिर्झा, अभिजित वंजारी, आमशा पाडवी, धीरज लिंगाडे, श्रीमती. उमा खापरे, ॲड. मनिषा कायंदे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव शिवदर्शन साठे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर हे उपस्थित होते.

या कृतीसत्रात महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सहसचिव डॉ. विलास आठवले, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कृतीसत्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, प्रशिक्षणात प्राविण्याच्या उद्दीष्टासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लोकांचे प्रतिनिधीत्व उत्तम प्रकारे करत असतात तेव्हाच नागरिक त्यांना निवडूण देतात. विधानपरिषदेत आपले वास्तव महत्वाचे असून, नागरिकांच्या समस्या अधिवेशनादरम्यान योग्यरित्या मांडणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची नोंद समाजातही घेतली जाईल. समाजात घडणाऱ्या अनुचित अथवा अन्यायकारक घटनांची दखल घेऊन प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, अल्पसूचना, भाषण अशा विविध आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून संबंधित घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकत असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय झाले आणि काय कामकाज होणार आहे. याबाबतची माहिती सदस्यांना दिली जाईल, जेणेकरून सदस्यांना त्यामध्ये असलेले मुद्दे माहीत होतील आणि त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. यासोबतच विधेयके कशी वाचली पाहिजेत यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, डॉ. गोऱ्हे यांचा विधिमंडळ सदस्यांना सातत्याने अद्ययावत करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले. विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातील पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर अधिवेशन कामकाज करताना विधिमंडळ कामकाज नियमावली पुस्तकाचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे संचालक निलेश मदाने यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago