शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे चासकमान कालव्याच्या कडेला एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी चासकमान कालव्याचे जवळ विनायक सातपुते हे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले असताना त्यांना सदर ठिकाणी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेवणनाथ मुत्तनवार, प्रतिक जगताप, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, सामाजिक कार्यकर्ते कचरू वाजे, कोंडीबा साबळे, राघू नप्ते, विशाल नप्ते, विनायक सातपुते, दादा सातपुते, सर्जेराव वाघमारे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्याच्या अंगावर निळसर रंगाची प्यांट व पांढऱ्या रंगाचा मळलेला शर्ट असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत विनायक दशरथ सातपुते (वय ४3) रा. मांजरेवाडी करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली, तर घटनास्थळी केंदूर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी माया पवार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत मृतदेहाचे दफन केले, तर सदर व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९४०५५८७००२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago