महाराष्ट्र

पोलीस महिलेच्या मुलीने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

नाशिक: सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे. पूजा दीपक डांबरे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या आत्महत्येच्या प्रकरणी आडगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नको, असं मुलीने इंग्लिशमधून सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या आशयाची सुसाईड नोट इंग्रजीत लिहून एका महिला पोलिस अंमलदाराच्या लेकीने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

पूजाने पुढील शिक्षणाची केली होती सुरुवात

आडगाव पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी माहिती देताना लिहिलं आहे की, पूजाने बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील पदवीला प्रवेश घेतला. वडील आणि आई दोघेही वेगळे राहत असल्यामुळे पूजा ही तिच्या आईकडे राहत होती. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पूजा शिक्षण करत होती.

मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक तिने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी पाठविला. सुसाइड नोट जप्त करीत तपास सुरू केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

58 मिनिटे ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

1 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

1 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

1 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

1 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago