महाराष्ट्र

महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

शिवसेना–एमआयएम एकत्र येण्याची शक्यता, गुप्त बैठकींनी चर्चांना उधाण

मालेगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी महापौर तथा एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.

या भेटीत महापौर-उपमहापौर निवडीसंदर्भातील रणनीती ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या चर्चांबाबत शिवसेना व एमआयएमच्या नेत्यांनी अधिकृत मौन बाळगले आहे. कट्टर मुस्लिम एमआयएम आणि हिंदुत्ववादी शिवसेना महापौर व उपमहापौर निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हॉटेलमध्ये गुप्त बैठक

एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी उपमहापौरपदासाठी आमदार पुत्र हाफिज अब्दुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांची गुरुवारी (दि. ५) मुंबई–आग्रा महामार्गालगत पाटणे शिवारातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे.

या बैठकीत शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार लता घोडके यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी एमआयएमचे नगरसेवक आणि आमदार मौलाना मुफ्ती यांच्या सतत संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.

निवडणुकीत रंगत

महापौर व उपमहापौर निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे सध्याच्या राजकीय हालचालींवरून स्पष्ट होत आहे. मालेगाव सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी नसरीन शेख आणि ताहेरा शेख, तर उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी लता घोडके, तर उपमहापौरपदासाठी नीलेश काकडे आणि नरेंद्र सोनवणे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. एमआयएमने उपमहापौरपदासाठी हाफिज अब्दुल्ला यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभा आणि कॉर्नर बैठकींमुळे राजकीय वातावरण तापले होते. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

22 मिनिटे ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

23 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago