क्राईम

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; परप्रांतीय तरुणाने फेसबुक लाईव्हकरत उडी मारून जीवन संपवलं

पिंपरी-चिंचवड: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका परप्रांतीय तरुणाने पत्नीपासून झालेल्या विभक्ततेच्या नैराश्यात फेसबुक लाईव्ह करत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद शाहू (वय अंदाजे …) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशमधील रहिवासी होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास भोसरी परिसरात महापालिकेच्या रुग्णालयालगत असलेल्या भाजी मंडईच्या इमारतीवर केसरी उभा राहिला होता.

यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह सुरू करत आपली व्यथा मांडली. पत्नी आपल्याला सोडून गेल्याने आपण तीव्र मानसिक तणावात असल्याचं त्याने सांगितलं. “माझं कोणी ऐकत नाही… मला फक्त माझ्या बायकोला एकदा भेटायचं आहे,” असं तो फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना दिसतो.

पत्नीपासून दुरावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या केसरीने अखेर फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच इमारतीवरून उडी मारत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, सोशल मीडियावरही या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago