महाराष्ट्र

राष्ट्रवादीत सत्ता हस्तांतरण! सुनेत्रा पवार बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षा; सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने झाला.

बैठकीत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला आणि त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना पक्षातील घडामोडींवर भाष्य केले.

“अजित पवारांना हिणवण्यात आले” – तटकरे

सुनील तटकरे म्हणाले, “२००४ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून निर्णय झाला असता, तर महाराष्ट्राने Ajit Pawar यांच्या रूपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री अनुभवला असता. मात्र तसं घडलं नाही. नेतृत्व ताकदवान होतं तेव्हा टीका होतेच. पण अजितदादांवर ज्या पद्धतीने टीका झाली, त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.”

ते पुढे म्हणाले, “२०१२ पासून ते आजपर्यंतच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात Sunetra Pawar यांनी सावलीसारखी साथ दिली. त्यामुळे अजित पवारांचा उत्तराधिकारी होण्याचा सन्मान त्यांचाच आहे.”

‘दुधवाला पण ६ वाजता उठतो’ – अप्रत्यक्ष टोला

लोकसभेनंतर अजित पवार यांचं राजकीय भविष्य संपल्याच्या चर्चा होत असल्याचा उल्लेख करत तटकरे म्हणाले, “मी तेव्हा म्हटलं होतं की महाराष्ट्रात ‘अजित पर्व’ सुरू होतंय. पण माझ्यावर टीका झाली. अजितदादांचं काम पहाटे ६ वाजता सुरू होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्यावरून ‘दुधवाला पण ६ ला उठतो, पेपरवाला पण उठतो’, अशा शब्दांत त्यांना हिणवलं गेलं.”तटकरे यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्यांवरचा अप्रत्यक्ष टोला मानलं जात आहे.

महायुतीत जाण्याचा निर्णय

२०२३ मध्ये राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्वतंत्र भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रफुल पटेल , छगन भुजबळ , सुनील तटकरे , हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, असेही तटकरे यांनी नमूद केले.सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे अजित पवार गटाला नवसंजीवनी मिळणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

42 मिनिटे ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

2 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

2 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

3 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

3 तास ago

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा…

3 तास ago