महाराष्ट्र

आनंद सोसायटी जमीन घोटाळा! अहवालच ‘चुकीचा’ ठरला; सहाय्यक निबंधक निलंबित

मुंबई: नागपूर ग्रामीण येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीने विकल्याच्या गंभीर आरोपांवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणात सहकार मंत्र्यांनी सभागृहात महत्त्वाची कबुली देत सादर झालेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य केले आणि सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच मुख्य अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची एका महिन्यात चौकशी पूर्ण करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

काय आहे प्रकरण?

नागपूर येथील आनंद सोसायटीच्या खसरा क्रमांक १०अ आणि १० ब मधील ११ हजार १०७ चौरस फूट जागा सार्वजनिक उपक्रमासाठी (ट्रान्सफॉर्मरसाठी) आरक्षित होती. मात्र संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी कथित आर्थिक व्यवहार करून ही जागा प्लॉटधारक साळुंखे यांना बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे.

वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, बेसा ग्रामपंचायत असताना दोन लेआऊट सार्वजनिक उपक्रमासाठी आरक्षित असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र बेसा नगरपंचायत झाल्यानंतर नकाशामध्ये बदल करून तीच जागा विकल्याचे उघड झाले. या प्रक्रियेत मुख्य अधिकारी आणि संबंधित उपनिबंधकांनी चुकीची नोंद व अहवाल दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारची भूमिका

प्रश्नोत्तर काळात उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर सहकार मंत्र्यांनी अहवालात त्रुटी असल्याचे मान्य करत तत्काळ सहाय्यक निबंधकांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगितले.या घोटाळ्यामुळे नागपूर ग्रामीण परिसरात मोठी चर्चा रंगली असून चौकशी अहवालानंतर आणखी कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

9 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

11 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

12 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

1 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

1 दिवस ago