महाराष्ट्र

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठी न येणाऱ्या अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी ‘व्यवहारिक मराठी’चे ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषेचा सन्मान राखण्यासाठी अमराठी चालकांनी मराठी शिकणे आवश्यक आहे.

चालकांना प्राथमिक मराठी शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असून, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे सहकार्य मिळत आहे. रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही या उपक्रमात सहकार्याची तयारी दर्शविली आहे.

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. मात्र, जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.

यासंदर्भात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. तसेच चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’चा लघु अभ्यासक्रम तयार करून जनजागृती मोहीम राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील चालकांना मराठी भाषा अवगत करणे अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago