महाराष्ट्र

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी क्र. २१६२ संदर्भात ही बैठक पार पडली.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहनिर्माण विभागाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत संवेदनशील उद्यानांमध्ये टप्प्याटप्प्याने माजी सैनिक सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना अधिक त्रास होत असलेल्या ठिकाणांपासून ही मोहीम सुरू करण्यावर भर देण्यात आला.

तसेच अंमली पदार्थ सेवन व समाजविघातक हालचालींवर आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस प्रशासनाने ‘मिशन मोड’मध्ये विशेष मोहीम राबवावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावी करावेत, असेही निर्देश देण्यात आले.

“सार्वजनिक उद्यानांचा गैरवापर सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीविरोधात प्रशासन ठामपणे उभे राहील,” असे स्पष्ट मत मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

या बैठकीस आमदार दिलीप लांडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त अजितकुमार आंबी, मुंबई पोलीस झोन १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago