महाराष्ट्र

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नागपूर: राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वीधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, गेली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. आम्ही जे निर्णय घेतले त्यावर जनतेने विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले. जनतेप्रती आमचे उत्तरदायित्व आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात विदर्भाला आम्ही न्याय दिला. आगामी काळात अधिक गतिमानपणे काम करून जनतेला लोकाभिमुख सरकारचा अनुभव देऊ.

गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामांन्यांचं सरकार कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ. अडीच वर्षात केलेल्या विकास कामांची ही आजची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य जनता आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू राज्याची वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच स्वप्न साकारले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago