महाराष्ट्र

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ची घोषणा.

नागपूर: राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असून कर्जमाफीचा गाजावाजा करताना दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्यांनाच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला जात आहे. एका हाताने मदत दिल्याचे दाखवायचे आणि दुसऱ्या हाताने आर्थिक मदत काढून घ्यायची, ही सरकारची फसवणुकीची नीती असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारकडे शेतकऱ्यांसाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र योजनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात अपेक्षित मदत पोहोचत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी पुन्हा करताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना निधी, वसतिगृहे आणि इतर सुविधा मिळत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी ३ ऑगस्टपासून पूर्व विदर्भात ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्यालाही मुद्दा उपस्थित केला. कालव्याला पाणी सोडल्यानंतर पहिल्याच दिवशी भगदाड पडल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

1 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

6 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

7 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

7 तास ago