महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह केवळ सांस्कृतिक वास्तू नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा करणारे आणि मराठी साहित्य, लोककला व संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

अण्णाभाऊ साठे यांनी गोरगरीब, कष्टकरी, दलित आणि वंचित समाजासाठी आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या साहित्याने समाजातील वास्तव आणि संघर्षाला आवाज दिला, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.

यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव वाटेगाव येथे ५० कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच संशोधन केंद्र आणि नाट्यगृहाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

नूतनीकरणानंतर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झालेल्या नाट्यगृहातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळेल आणि मराठी रंगभूमीला नवी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिका प्रशासनाने हे नाट्यगृह सर्वसामान्य कलाकार व सांस्कृतिक संस्थांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार प्रकाश सुर्वे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, भाई गिरकर, माजी आमदार सदा सरवणकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago