महाराष्ट्र

पुण्याच्या वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा ‘बायपास’! ५२ हजार कोटींचा रिंग रोड वेगाने मार्गी

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. तब्बल ५२ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातून जाणाऱ्या अवजड आणि मालवाहतूक वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर आणि अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

पुण्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवजड व मालवाहू वाहने येतात. सध्या प्रभावी बाह्यवळणाचा पर्याय मर्यादित असल्याने यातील मोठ्या प्रमाणातील वाहतूक शहराच्या अंतर्गत भागातून जाते. परिणामी वाहतूक कोंडीसोबतच वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रवेश नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) रिंग रोड उभारण्यात येत आहे.

१७० किलोमीटरचा, ६ ते ८ पदरी मार्ग

सुमारे १७० किलोमीटर लांबीचा हा चक्राकार मार्ग ६ ते ८ पदरी असणार आहे. काँक्रीटच्या या मार्गावर वाहनांना ताशी १२० किलोमीटरपर्यंत वेगाने प्रवास करता येणार आहे. भविष्यात या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्याच्या मध्यभागी आवश्यक जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

१४ बोगदे, ९३ पूल-वायडक्ट अन् १६ इंटरचेंज

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून मार्ग काढताना रिंग रोडवर १४ मोठे बोगदे आणि ९३ पूल-वायडक्ट उभारण्यात येणार आहेत. वाहतुकीची जोडणी अधिक सुलभ करण्यासाठी १६ इंटरचेंज प्रस्तावित आहेत. हा चक्राकार मार्ग तब्बल ९ राष्ट्रीय महामार्गांना जोडणार असून पुणे जिल्ह्यातील ६ तालुके आणि ८२ गावांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

शहरातील वाहतुकीचा भार होणार कमी

रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातून केवळ जाण्यासाठी येणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच पुढे मार्गस्थ होतील. त्यामुळे प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यासोबतच वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणालाही आळा बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम टप्पा २०२८, पूर्व टप्पा २०२९ मध्ये

प्रकल्पाचा पश्चिम भाग २०२८ मध्ये, तर पूर्व भाग २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. रिंग रोड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. वाढते नागरीकरण, औद्योगिक विस्तार आणि पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेता हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

10 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

10 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

10 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

10 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

10 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

10 तास ago