विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर घेतली महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट
वडोदरा: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीत सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. वडोदऱ्याच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या महाराणी राधिकाराजे गायकवाड या सामाजिक कार्यातही सक्रिय असून, त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या भेटीत महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन,तसेच ऊसतोड महिला मजूर यासारख्या अनेक विषयांवर संवाद साधत सहकार्याची भावना व्यक्त केली.त्याचबरोबर,या भेटीमुळे महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देश पातळीवर एकसंघाने काम करण्याची नवी दृष्टी निर्माण होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील महिला विषयी भविष्यातील कार्यक्रमास आपण आवर्जून यावे अशी ईच्छा व्यक्त केली व त्यास राधिका राजे यांनी देखील कुठलेच किंतू परंतु न दाखवता मला यायला नक्कीच आवडेल असे मत व्यक्त केले.या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वरील योद्धा पुस्तक डॉ.गोऱ्हे यांनी राजे यांना भेट दिले. या भेटीत डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सोबत स्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी देखील उपस्थित होत्या.
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…