महाराष्ट्र

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना धक्का; ज्येष्ठ नेत्याने सोडली साथ

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधून एकत्र येण्याच्या चर्चेला उत आला आहे. अशातच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून मनातील खदखद व्यक्त करत थांबण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता थेट राजीनामा देत निर्यणचच जाहीर केला आहे.

प्रकाश महाजनांनी व्यक्त केली खद खद

मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिल्यास पाहिजे असं नाही आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्याच वेळी थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे पहेलगामच्या वेळी मी थांबायला पाहिजे होतं.

विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचा कौतुक नाही मग माझ्या हातून जा चुका झाल्यास नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले.

जे पाप माझ्याकडून घडले नाही त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजी नगर सभेत हे शब्द दिला होता अमित जी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली मी दिलेला शब्द पाळू शकत नाही अमित जी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतंय. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही हा नशिबाचा मी एक भाग समजतो असंख्य मनसैनिकांनी माझ्या वरती मनापासून प्रेम केलं वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधु आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांबच होते. मध्यंतरी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची मनधरणी योग्य पद्धतीने झाली नव्हती.

मनसेचा प्रमुख नेता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मनसेचा ते बुलंद आवाज होते. टीव्ही डिबेट शो मध्ये ते मनसेचा मु्द्दा लावून धरायचे. अलीकडच्या काळात त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दीक वाद रंगला होता. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात दृढ मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

पण त्यावेळी मला असं वाटलं की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

21 तास ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

21 तास ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

21 तास ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

22 तास ago

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच…

23 तास ago

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे (cavities) आणि हिरड्यांचे आजार (gum…

23 तास ago