महाराष्ट्र

माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं जीवन संपवत आहेत . अशातच आता मुलांना शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने एका पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावातील शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (32) नावाच्या व्यक्तीने जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी (ता.13) संध्याकाळी विजेच्या प्रवाहाचा धक्का घेत जीवन संपवलं.

मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलांना जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना ते प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र नसल्याने मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. अशातच कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणावामुळे त्यांनी आपलं जीवन संपल्याचं सांगितलं जात आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय?

शिवाजी मेळ्ळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये लिहिलं की, ‘माझे दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतो. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.

या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे महादेव कोळी समाजाच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीवर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाला उर्वरित महाराष्ट्रात लाहू असेलेले निकष लावून जात प्रमाणपत्र द्यावी आणि व्हॅलिडीटी सोपी करावी या मागीसाठी आंदोलन केलं होतं. शिवाय 17 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात आंदोलनासाठी हाक दिली होती. अशातच आता मेळ्ळे यांच्या आत्महत्येमुळे हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

16 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago