मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल ऑडिओ कॉलची दखल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत नाराजी जाहीर केल्याचे समोर आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी अजित पवारांकडे बोलून दाखवली असल्याचंही बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला होता. यानंतर आता अजित पवारांनी यावर भाष्य केलं असून, हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आम्हा तिघांमध्ये सर्व काही चांगलं सुरु असल्याचं म्हटलं आहे.
“माझं काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे. मग तेच उगाळत बसता. मी मागील 35 वर्षं काम करत असताना कशाप्रकारे वागतो हे विचारा. उत्खनन बेकायदेशीर होतं की नाही याबाबत सरकार निर्णय घेईल. मुख्यमंत्री खंबीर आहेत, त्यामुळे काळजी करु नका,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
“मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. मी ट्विट केलं असून, मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांनी जी भूमिका मांडायची ती मांडली असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याची नोंद घेतली आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी फडणवीसांमध्ये आणि माझ्यामध्ये नाराजी नाही हे स्टॅम्पवर लिहून देऊ का? अशी विचारणा केली. “आम्ही एकत्र बसतो तेव्हा कधीही तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री विश्वास देऊन काम करतात. त्यांना चांगला अनुभव आहे, प्रशासन चांगल्या प्रकारे चालवतात. एकनाथ शिंदे यांचीही कारकिर्द पाहिली तर प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा तिघांचा प्रयत्न असतो. आमच्या तिघांचं व्यवस्थित चांगलं सुरु आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “140 कोटी जनता असल्याने वेगवेगळे मतप्रवाह, विचार असणार. आपण एकमेकांचे शत्रू म्हणून वागत असताना सकारात्मक प्रतिसाद दिला, पण समोरुन प्रतिसाद आला नाही; खिलाडू वृत्ती पाहावं असं म्हणणारेही आहेत. जितके लोक तितकी मतं असतील. कोणी कसा विचार करावा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा तिथे घेण्यात आला आहे”
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…