महाराष्ट्र

राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करणार; 2 ऑगस्ट रोजी ठाकरेंचा मार्गदर्शन मेळावा

मुंबई: महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षची नाराजी दूर करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

2 ऑगस्ट रोजी पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष 78 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज ठाकरे शेकापच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आगामी स्थानीक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत शेतकरी आणि कामगार यांची प्रमुख भूमिका असणार आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारला एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोकण विभागात शेतकरी कामगार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सहित मनसे आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र येऊन कोकण काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. पनवेलमधील राज ठाकरे यांचा भाषण शेकापची नाराजी दूर करणार आहे, असा विश्वास मनसे नेत्यांनीव्यक्त केला आहे.

ठाकरे बंधूंची वज्रमूठ

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकसाठी दोन्ही बंधु एकत्र आले तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनाची अडचण वाढली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago