महाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त टिळक भवनमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन वाचन करण्यात आले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सोनू शुक्ला, सुभाष पाखरे, दत्ता नांदे, नामदेव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago