महाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट 

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत पोलिसांच्या ताब्यात असलेली वाहने शोधून ती मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलिसांनी केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत ६७ वाहने शोधून त्यांचे मूळ मालक गाठत पोलिसांनी तब्बल ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील, अपघातांतील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली अनेक वाहने दीर्घकाळ पडून होती. या वाहनांचे मूळ मालक शोधून ती त्यांच्या ताब्यात देण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांनी वाहनांचे आरटीओ क्रमांक, चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या मदतीने संबंधित वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली.

शिक्रापूर पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी १३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ३२ दुचाकी त्यांच्या मूळ मालकांना परत केल्या होत्या. त्यानंतर १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी आणखी २३ लाख ६० हजार रुपये किमतीची ३५ दुचाकी व चारचाकी वाहने मालकांच्या ताब्यात देण्यात आली. अशा प्रकारे दोन महिन्यांत एकूण ६७ वाहने आणि ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन पुन्हा मिळवण्यासाठी नागरिकांना अनेकदा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वाहनमालकांचा शोध घेऊन वाहने परत करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक नागरिकांची अडकून पडलेली मालमत्ता त्यांना पुन्हा मिळाली आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासोबतच नागरिकांच्या मालमत्तेची योग्य ती परतफेड करण्यासाठी पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बेवारस वाहनांच्या मालकांना पोलिसांचे आवाहन

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात अद्यापही काही बेवारस वाहने पडून आहेत. संबंधित वाहनमालकांनी वाहनाच्या मालकी हक्काचे पुरावे आणि आवश्यक कागदपत्रांसह शिक्रापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अन्यथा नियमानुसार संबंधित वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी मुद्देमाल कारकून एन. डी. नाईकडे (मो. ७५८८१४५३७०) किंवा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (मो. ९९२३६३०६५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळविले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे आणि अक्षदा पाणमंद यांच्या पथकाने ही कामगिरी केली. लाखो रुपयांची वाहने मूळ मालकांना परत मिळवून देत शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे (cavities) आणि हिरड्यांचे आजार (gum…

1 तास ago

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

23 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

23 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

23 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

23 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

23 तास ago