महाराष्ट्र

रिक्षाचालकाचे शाळकरी मुलींसोबत विकृत चाळे, पालकांनी दिला चोप…

औरंगाबाद: मागील अनेक दिवसापासून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहोत. अशीच एक घटना औरंगाबाद शहरातील नामांकित शाळेत अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या तीन विद्यार्थींनींसोबत एका रिक्षाचालकाने दुसऱ्याच्या व्हॅनमध्ये बसून अश्लील संवाद साधत विकृत चाळे केल्याची घटना उघडीस आली असून धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या दाेन मुली तापाने फणफणल्या. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. विकास विठ्ठल बनकर (वय ४३), रा. आंबेडकरनगर आणि राजू मोहन रुपेकर (वय ४८), रा. पिसादेवी परिसर अशी त्यांची नावे आहेत.

स्कूलबस शाळेच्या मागे उभी करून चालक चहा पिण्याच्या बहाण्याने बस सोडून जायचा आणि त्याचवेळी एक रिक्षाचालक स्कूलबसमध्ये घुसायचा घुसून आठ व नऊ वर्षीय तीन शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करायचा. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकांना सांगायचं नाही म्हणून धमक्या द्यायचा. मात्र घाबरलेल्या मुलींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळेत सापळा रचून अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला रंगेहात पकडून चोप देत सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच परिसरात राहणाऱ्या तिन्ही मुली शहरातील एन-9 हडकोतील एका शाळेत शिकतात. तर तिन्ही मुली आरोपी राजू रुपेकर याच्या स्कूलबसमधून नियमित शाळेत जातात. दरम्यान 7 डिसेंबरला रुपेकरने शाळेच्या मागे नाल्याजवळ स्कूलबस उभी करून चहा पिण्याच्या निमित्ताने तो निघून गेला. मात्र रुपेकर जाताच आधीपासून तेथेच असलेला रिक्षाचालक विकास बनकर स्कूलबसमध्ये घुसला आणि त्याने तिन्ही अल्पवयीन मुलींशी अश्लील बोलणे, गालांवरुन ओठांवरुन हात फिरविणे, असे घाणेरडे प्रकार सुरु केले. त्यामुळे तिघी प्रचंड घाबरल्या.

औरंगाबाद शहरात घडलेल्या या घटनेनंतर पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर मुलींचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्कूल बसमध्ये CCTV कॅमरे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावरुन शाळेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप होत आहे. तर या सर्व घटनेत शाळेचा हलगर्जीपणा समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago