महाराष्ट्र

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव

बुलढाण्यात शिंदेसेनेच्या आमदाराची दादागिरी; भ्रष्ट मार्गाचा अवलंब; कारवाई करण्यास पोलिसांचीही चालढकल

मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

नगरपालिकेच्या मतदानावेळी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार पाहण्यास मिळाले. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बुलढाण्यात ग्रामीण भागातून गाड्या भरून बोगस मतदार आणण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि पोलिसही किरकोळ कारवाई करतो असे सांगतात, ही लोकशाहीची थट्टा आहे. सत्ताधारी किती भ्रष्ट आहेत व गुंडगिरी करतात हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले. काँग्रेसला वातावरण पोषक आहे पण सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. सत्ताधाऱ्यांनी काहीही केले तरी काँग्रेसचा विजय होणार असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि केवळ दीड तास उलटत नाही तोच बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एकाला बोगस मतदान केल्यानंतर पकडले. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. कोथळी, इब्राहिमपूर येथून अनेक लोक बोगस मतदान करण्यासाठी आणण्यात आले. घाटाखालून गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले होते, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

49 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

1 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago