मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘Paint Your Own Paper Mache Bappa’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यशाळेला भेट देत हातकागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीला नैसर्गिक रंगांनी रंगविले. यावेळी त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करून पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पेपर माशेपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींना नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून आकर्षक रूप दिले. पर्यावरण संवर्धनासोबतच पारंपरिक हातकागद कलेचे जतन, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि ग्रामीण कारागिरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम ठरला.
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…
रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…
मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…