शिरूर तालुका

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता. ७) अपघाती निधन झाले. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात थोरात गुरुजी जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, एका आदर्श शिक्षकाचा खड्ड्याने बळी घेतला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, एका आदर्श शिक्षकाला खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. थोरात गुरुजी यांच्या निधनानंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मारुती थोरात यांची परिसरात थोरात गुरुजी म्हणून ओळख होती. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून, अनेकजण उच्च पदांवर कार्यरत आहेत. सफेद पायजामा, शर्ट आणि डोक्यावर टोपी अशी त्यांची साधी राहणी होती. सेवानिवृत्तीनंतर विविध क्षेत्रात ते कार्यरत होते. सतत हसतमुख चेहरा, काटक शरीरयष्टी आणि दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

मारुती थोरात गुरुजी यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहिण, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शिक्षक दिलीप थोरात हे पुत्र तर शिक्षिका वैशाली थोरात या सून होत. सेवानिवृत्त शिक्षक संजय जगताप हे जावई तर प्रगतशील बागाईतदार लक्ष्मण थोरात हे बंधू होत. दरम्यान, वाघाळे येथे रविवारी (ता. १३) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

वाघाळे येथील राजेंद्र विठ्ठल धायबर यांचे निधन

ऍड. अपेक्षा अशोक थोरात यांचे अपघाती निधन

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

4 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

1 दिवस ago