महाराष्ट्र

आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सदिच्छा भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय सुविधा, उपचारपद्धती आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात सचिन अहिर यांनी रुग्णालयातील आयुर्वेदिक पंचकर्म विभागाला भेट देऊन तेथील उपचारपद्धती आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचीही चाचपणी केली.यानंतर अहिर यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करत रुग्णांना मिळणाऱ्या उपचार आणि सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णालयातील उपचार व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

“नागरिकांना सर्वोत्तम, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे,” अशा स्पष्ट सूचना सचिन अहिर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.यावेळी आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक तथा अधिष्ठाता संपदा संत, विभागप्रमुख दत्ता नरवणकर, नगरसेविका वनिता नरवणकर यांच्यासह रुग्णालयातील पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

7 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

7 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

7 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

7 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

7 तास ago