महाराष्ट्र

संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार

पंढरपूर येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने शिंदे यांचा सन्मान

पंढरपूर: नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणं दिले.ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्या रचना या मराठी भाषेतच आहेत. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाडामधील श्री केशवराज मंदिरात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आज संतशिरोमणी श्री संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील, गुरुमहाराज चैतन्यस्वामी देगलुरकर, निवृत्ती महाराज, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, भक्तशिरोमणी संत श्री नामदेवमहाराजांचे वंशज व परिवार सदस्य, वारकरी संप्रदायातले प्रमुख कितर्नकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी अनेकवेळा मी पंढरपुरात येऊन गेलो, पण आजचे वातावरण बघून मन भरुन गेले. संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हा सोहळा होतोय, या वाड्यात अनेक संतांचे वास्तव्य होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने इथं सेवा केली. त्यामुळे इथं पुरस्कार मिळणं हे मोठं भाग्य समजतो. हे स्थान म्हणजे वारकऱ्यांचे चालते बोलते विद्यापीठ आहे. नामदेव महाराजांच्या नावे हा पुरस्कार म्हणजे कृतार्थ होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आहे, असे ते म्हणाले. मला काय मिळालं यपेक्षा समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आजवर काम केले. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा पुरस्कार असल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. संत सजन्नांनी आणि लाखो वारकऱ्यांनी दिलेला हा पुरस्कार रुपी आशिर्वाद आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय, असे ते म्हणाले. बाळासाहेब, दिघे साहेब सांगायचे संत सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्याच मार्गाने आपण पुढे जातोय, असे ते म्हणाले.

नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि तिथं रुजवली वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. नामदेव महाराज जितके मराठी माणसांचे आहेत तितकेच ते शिखांचे देखील आहेत. किर्तन कलेतून प्रत्यक्ष पांडुरंग डोलायचे, अशी नामदेव महाराजांची किर्ती होती. त्यांनी निष्ठेने वारकरी पंथांचा प्रसार केला. बहुजन समाजाच्या सुप्त आकांक्षा जागवल्या. साधुसंतांच्या चरणांच्या धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपुरात विठ्ठल मंदिरात महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. कुत्र्याने भाकर पळवली तर त्याला ती कोरडी खायला लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन पळणाऱ्या नामदेव महाराजांच्या ठायी प्रचंड माणुसकी आणि भूतद्या होती, हे दिसून येते. हे सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या राज्यात कोणी उपाशी राहू नये, औषध उपचारांविना रुग्णांचे हाल होता कामा नये, शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशीच सरकारची भावना आहे. हा एकनाथ शरिरात रक्ताचा थेंब असे पर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत राहिल. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान नेहमीच वरचढ राहिले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडण्यासाठी कटिबद्ध

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळ, वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान, विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी असे अनेक निर्णय सरकारने घेतले. मंदिर हेच संस्कारांचे मुख्य केंद्र असल्याने सरकारने ब तिर्थक्षेत्रांचा विकास निधी २ कोटींवरुन ५ कोटी केला. गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध होतो, आहे आणि राहीन, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संताचे विचार समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला या परंपरेशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

3 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

3 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

3 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

4 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

5 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

5 तास ago