महाराष्ट्र

पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.

 

या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर हितसंबंध आणि विशेष कौशल्य असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि इतर सामाजीक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य सुलभ करणे, दीर्घकालीन सहयोग दृढ व वृध्दिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून मुहुर्तमेढ स्थापणे तसेच माहितीची परस्पर देवाणघेवाण करणे आणि माहिती, समानता, परस्पर लाभ आणि सहकार्याच्या तत्त्वांनुसार, पथदर्शी प्रकल्प किंवा संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष योजनेची कल्पना व अंमलबजावणी करणे हा आहे.

 

बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम तसेच बुसान कार्पोरेशनचे नियोजन विभाग आणि कॉम्प्लेक्स बिझनेस विभागातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाने पुणे बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे प्रतीनीधी स्वरुपात उपस्थीत होऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर PMRDA चे महानगर आयुक्त, राहुल महिवाल व बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम यांनी स्वाक्षरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत असलेली सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था या दोन्ही शहरांमधील सामंजस्य कराराची समन्वय संस्था म्हणून काम करेल असे निश्चित करण्यात आले. 

 

PMRDA ने प्रस्तावीत प्रारुप विकास आराखडा , माण- हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी पुणे मेट्रो लाईन 3, रिंगरोड प्रकल्प, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र प्रकल्प आणि भोसरी जिल्हा केंद्र यासारख्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहीती उपस्थीत प्रतीनिधींना दिली. त्याचप्रमाणे, बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधींनी त्यांचे विविध यशोगाथांचे सादरीकरण केले. याद्वारे दोन्ही शहरांमधील नियोजन, प्रशासन आणि अंमलबजावणी मधील यशस्वी प्रयत्नांचे बौध्दिक आदान प्रदान पार पडले.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

11 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

11 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

15 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

15 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

15 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

15 तास ago